सौ प्रतिभाताई पवारांचा वाढदिवस निलंगा येथे साजरा


 सौ प्रतिभाताई शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...


 वाढदिवसानिमित्त निलंगा येथील आश्रमशाळेत रक्तदान व साडी वाटप कार्यक्रम संपन्न....


निलंगा येथे खासदार शरद पवार व सौ.प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेत रक्तदान शिबिर व साडी वाटप कार्यक्रम संपन्न...


निलंगा :- स्वतःच्या दुःख व वेदनेवर मात करीत भटक्या विमुक्त,दलित, ओबीसी अशा वंचित व उपेक्षित समाजातील व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन घडवून  आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व राजकीय व सामाजिक जीवनात त्यांना विविध संधी उपलब्ध करून देणारे  खासदार शरद पवार हे माणसाला माणूसपण देणारे परिस असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश  ॲड. व्यंकटराव कदम यांनी  केले. 

भारताचे माजी कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचा 12 डिसेंबर रोजी तर  त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रतिभाताई शरदचंद्रजी पवार यांचा 13 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने  रविवार दि.13 डिसेंबर रोजी निलंगा येथील वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेत "रक्तदान शिबिर व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना ॲड. कदम हे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हैदरवली दर्गा चे सज्जादे सय्यद शहा नबीरा कादरी, ॲड. हरिभजन पौळ, रिपाईचे विलास सुर्यवंशी, शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख अविनाशदादा रेशमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदुरे, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, भारतीय बौद्ध महासभेचे प्रा. रोहित बनसोडे, सेवानिवृत्त सहाय्यक दुय्यम निबंधक रजनीकांत कांबळे, विर लहुजी क्रांती सेनेचे गोविंदराव सूर्यवंशी, गणराज्य संघाचे रामलिंग पडसाळगे, अशोकराव पाटील निलंगेकर मित्रमंडळाचे प्रा. दयानंद चोपणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, ॲड.किरणकुमार घोलप, महादेवी पाटील,सौ.कलावती माने, वैजनाथ चोपणे, शिवाजी जाधव, श्रमिक विकास संस्थेचे अध्यक्ष तथा भटक्‍या विमुक्तत संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विलास माने, श्रमिक विकास संस्थेचे सचिव विकास माने, अंगद जाधव ,उत्तम माने, शिवाजी जाधव, पत्रकार झटिंगराव म्हेत्रे, रविकिरण सूर्यवंशी, रमेश शिंदे, असलम झारेकर,सौ. आशाताई जाधव,सौ.भाग्यश्री माने, उषाताई जाधव आदी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी माऊली ब्लड बँक लातूर च्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोणाच्या  संकटकाळात कोरोणा योद्धा म्हणून कार्य केलेल्या  नगरपालिकेचे  महिला सफाई कामगार, उपजिल्हा रुग्णालयातील महिला सफाई कामगार व तसेच समाजातील  गरीब गरजू महिलांना  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक लातूर रत्न व साप्ताहिक निलंगा माझा च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सौ प्रतिभाताई शरदचंद्रजी पवार यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत शरद पवार यांना सामाजिक व राजकीय जीवनात समर्थ साथ दिली आहे.  शरद पवार राजकीय नेते असले तरी  त्यांचे कार्य चौफेर आहे.गोरगरीब, वंचित, उपेक्षित, दलित, भटक्या विमुक्त, ओबीसी समाजाबद्दल कणव असणारा व त्यांच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारा असा असामान्य नेता म्हणजे शरद पवार असल्याची भावना याप्रसंगी बोलताना अनेकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीशैल  बिराजदार यांनी तर आभार दशरथ जाधव यांनी मानले.