अन्नधान्य निर्माण करणारा बळीराजा संकटात असताना राज्यातील आघाडी सरकारने कसलीच मदत केली नाही उपाशी ठेवण्याचे पाप केले असून हे काय पदवीधरांचे प्रश्न सोडवणार असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्षा खा. प्रितमताई मुंडे यांनी उदगीर येथील पदवीधरांच्या मेळाव्यात बोलताना केला.
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार शिरीष बोरकर यांच्या प्रचारार्थ उदगीर येथील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि पदवीधरांच्या मेळाव्यात खासदार प्रितमताई मुंडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड होते यावेळी खासदार सुधाकर शृंगारे ,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव प्रदेश भाजपाचे नागनाथअण्णा निडवदे गोविंदांना केंद्रे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड ,अनुसूचित जातीच्या जिल्हा अध्यक्ष बालाजी गवारे उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे उपनगराध्यक्ष सुधीर भोसले जिल्हा परिषदेच्या सभापती ज्योतीताई राठोड जिल्हा परिषद सदस्य बसवराज कोळखेडकर उषा रोडगे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर जळकोट तालुका अध्यक्ष अरविंद नागरगोजे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश सोनवणे महिला आघाडीच्या स्वाती जाधव मीनाक्षी पाटील उत्तरा ताई कलबुर्गे ललिता कांबळे सरोजा वारकरे शामल कारामुंगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
निष्क्रिय माणसाला पुन्हा मत देऊन वाया घालवण्यापेक्षा खऱ्या अर्थाने पदवीधरांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे असे आव्हान करून उद्या राज्यात भाजपाची सत्ता येणार आहे पदवीधरांची ही निवडणूक सत्ता परिवर्तनाची सुरुवात असल्याचेही खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बोलून दाखविले