प्रेस नोट
शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर ,वकील मतदार संघ निर्माण करावा. अॅड . प्रभाकर काळे
उदगीर ,
प्रतिनिधी / दिनांक 22/ 5 /20 संविधान बचाव विधिज्ञ कृती समितीचे अध्यक्ष तथा उदगीर वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रभाकर काळे यांनी दिनांक 22. 5 .20. रोजी उपजिल्हा अधिकारी उदगीर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे यांना काही मागण्याचे निवेदन दिले आहे ,त्यात असे म्हणाले आहे की ,महाराष्ट्रात दिवसेंदिवस वकिलांची संख्या वाढत आहे. वकील म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे .महाराष्ट्रात जसा शिक्षक मतदारसंघ आहे, त्या धर्तीवर मुंबई ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ .या चार विभागात वकील मतदार संघाची निर्मिती करण्यात यावी, जेणेकरून वकिलांचे प्रश्न आणि अडचणी सभाग्रहात मांडण्यात येतील. तसेच सध्या जगात कोरोना वायरस ने घुमा काळ घातला असून, भारतात महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे 22 मार्चपासून लॉक डाऊन झाले, असल्यामुळे अनेक जुनियर वकील हे आर्थिक अडचणीत आले आहेत , जसे वकिलांना पंजाब ,हरियाणा ,राजस्थान, उत्तर प्रदेश, सरकारच्या धर्तीवर ,महाराष्ट्र सरकारने ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ज्युनिअर वकिलांना लॉक डाऊन काळात दरमहा 15 हजार रुपये आर्थिक मानधन देण्यात यावे,
तसेच 30 वर्ष कालावधी पेक्षा अधिक काळ विधी सेवेत योगदान देणाऱ्या, जेष्ठ वकिलांना त्यांच्या हयाती पर्यंत दरमहा 25000 रुपये सेवा सन्मान मानधन चालू करण्यात यावे,
तसेच वकील व्यवसायास अत्यावश्यक सेवा घोषित करून, त्याअनुषंगाने वकिलांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे.
अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर विधिज्ञ कृती समितीचे अध्यक्ष अॅड.प्रभाकर काळे ,अपाध्यक्ष अॅड. हिसमुद्दिन खतीब,सचिव पवन कोणे,कार्याध्यक्ष अॅड. डॉ. श्रवण कुमार माने, अॅड,नाजिम पटेल , अॅड वसंत बोडके. अॅड प्रफुलकुमार उदगीर ,अॅड मारोती चव्हाण. अॅड अभिजीत साबने. अॅड, जयवर्धन भाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
मा संपादक... दैनिक/ साप्ताहिक
वरील बातमी आपल्या वर्तमान पेपरला देवून सहकार्य करावे
आपला
अॅङ प्रभाकर काळे
शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर वकिल मतदार संघाची निर्मिती कारा मुख्यमंत्र्यांला निवेदन =अॅड, प्रभाकर काळे