साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं आणि दुकानं उघडलीच तर खालील नियमावलीचे काटेकोर पणे पालन करण बंधनकारक असेल.
१) दुकान उघडल्या उघडल्या एकदम झुंबड उडवायची नाही.
नाहीतर पोलीस मजबूत रट्टे देतील आणि दुकानं पुन्हा बंद करतील.
२) सुरक्षित अंतर ठेवूनच रांग लावायची... पेग भरतांना जशा आपण कट टू कट लाईन चेक करतो ती आपली शिस्त इथेही दिसली पाहिजे.
३) हावरटा सारखा स्टॉक घ्यायचा नाही सगळ्यांना माल पुरला पाहिजे.
४) आपल्या ब्रँडच्या हिशोबाने मोजके पैसे हातात तयार ठेवायचे कार्ड वैगरे नाचवण्यात वेळ घालवायचा नाही.
५) घरातून निघतांना कापडी पिशवी सोबत न्यावी तिकडे थैली दो वैगरे फालतूगिरी करण्यात मागच्याचा नंबर लांबवायचा नाही.
६) आणलेला माल नीट सॅनिटाईज करून मगच घरात घ्यावा.
७)कित्येक दिवसांनी माल हातात आलाय म्हणून बाटली उलटवायची नाही. बेताने ग्लास भरावेत लॉगडाऊन किती वाढेल याचा नेम नाही.
८) चखण्याच्या फर्माईशी करून गृहिणींना छळू नये जे भेटेल ते वाटीत घ्यावं आणि शिस्तीत प्यावं.
९) पोटात गेली की धिंगाणे करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांची उतरायच्या आत त्यांना नीट सुजवल जाईल.
१०) सगळा कार्यक्रम व्यवस्थित जमला की पहिल्यांदा साहेबांचे जाहीर आभार मानावेत आणि मगच मुख्य कार्यक्रमाला सुरवात करावी.
११) आपली आपण एकट्याने घ्यावी हळदीला बोलावतो तसे मित्रांना बोलावून सामूहिक रित्या हा कार्यक्रम करू नये.
१२ ) अतिशय महत्वाचं म्हणजे ज्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं शक्य केलंय निवडणूका आल्या की त्यांच्या ह्या उपकारांची नक्की जाणीव ठेवावी.
😂😂😂😂😂😂😂