Coronavirus: जगभरात कंडोमचा तुटवडा येणार, कंडोमच्या किंमती वाढण्याची भीती
जगातील सर्वात मोठ्या कंडोम निर्मिती करणाऱ्या कंपनीने व्यक्त केली भीती
Coronavirus: जगभरात कंडोमचा तुटवडा येणार, कंडोमच्या किंमती वाढण्याची भीती
जगभरात कंडोमचा तुटवडा येणार
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याआधीपासूनच देशामध्ये कंडोमचा खप ५० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त समोर आलेलं असतानाच जागतिक स्तरावर कंडोमची कमतरता भासू शकते अशी भीती आता जगातील सर्वात मोठ्या कंडोम निर्माता कंपनीने व्यक्त केली आहे. जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लॉकडाउनमुळे जगभरातील कंडोमचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यातच उपलब्ध असणारा पुरवठा हा केवळ दोन महिने टिकेल इतकाच आहे असं मलेशियातील कारेक्स बीएचडी या कंपनीने स्पष्ट केलं आहे. जगभरात बनवल्या जाणाऱ्या एकूण कंडोमपैकी प्रत्येक पाचवा कंडोम हा कारेक्स कंपनीमध्ये बनतो. त्यामुळेच या कंपनीने दिलेला इशारा हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.