देवणीतील महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची प्रतिकृती बदलली

देवणीतील महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची प्रतिकृती बदलली
 जातीयवादी  कंत्राटदारांची चौकशी व्हावी
----------------------------------
संपूर्ण महाराष्ट्रात समाजकल्याण विभागाने बांधलेल्या वसतिगृहाची प्रतिकृती नागपूर च्या दीक्षाभूमीची प्रतिकृती ठरवून दिली आहे परंतु देवणीतील वसतिगृह  ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बांधले जात नाही  सदर इमारतीवर दीक्षाभूमी सारखा घुमट बांधला नाही हा तर मोठा जातीयवाद
----------------------------------
गिरीधर गायकवाड
---------------------------- 
देवणी  : महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या मुलांना वसतिगृहात राहून  उच्च शिक्षण घेता यावे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणा विषयी हेळसांड होऊ नये महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय वसतिगृह बांधली आहेत व त्या वसतिगृहाची प्रतिकृती म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक इमारतीवर  नागपूर येथील दीक्षाभूमीची प्रतिकृती घुमट वापरले गेला आहे परंतु देवणी येथे बांधण्यात आलेल्या इमारतीवर अश्या प्रकारचा मोठा दीक्षाभूमी सारखा घुमट वापरला गेला नाही हा केवळ जातीयवादआहे याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी त्या कंत्राट दराचे बिल काढण्यात येऊ नये अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे 
  " शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही " 
शिक्षणा शिवाय मनुष्याच्या जीवनात परिवर्तन किंवा क्रांती नाही " म्हणून
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र दिला शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले या बाबत वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्या पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यापुढे असावा हा उद्दात्य हेतू ठेऊन  महाराष्ट्रात समाजकल्याण विभागाच्या वतीने   सुंदर अश्या दीक्षाभूमी ची प्रतिकृती ठरवून दिली आहे त्या प्रकारचे बांधकाम देवणी येथे करण्यात आले नाही केवळ हा जातीयवादी प्रकार असून त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे