*-: आजचा दिनविशेष :-*
*आज ३१ मार्च.*
*दि. ३१ मार्च १९९० रोजी भारतीय घटनेचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना "भारतरत्न" ही उपाधी घोषित करण्यात आली होती.*
[२२. भीमराव रामजी आंबेडकर. (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९०. भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते.]
*"भारतरत्न"*
भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नाव बुद्ध धम्माशी संबंधित आहे. 'भारतरत्न'. "रत्न" ही बुद्ध धम्माची पदवी. बुद्ध, धम्म, संघ म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न. बुद्ध धम्मात सर्वश्रेष्ठ व्यक्तीला "रत्न" ही पदवी बहाल केली जाते. अनेक बौद्ध भिक्खुंच्या नावातही रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो. उद. भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे. रत्न ह्या महान शब्दाचा बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता म्हणून बाबासाहेबांनी आपल्या एक लाडक्या मुलाचे नाव देखील रत्न शब्दांशी संबंधित ठेवले होते. 'राजरत्न' (ज्यांचे बालवयातच अकाली निर्वाण झाले) त्या रत्न ह्या महान शब्दावरुनच देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नाव "भारतरत्न" ठेवण्यात आले आहे.
भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह स्वरुप देखील बुद्ध धम्माशी निगडीत आहे. बोधीवृक्षाच्या पानाशी पिंपळाच्या पानासारखे सोनेरी पान, ज्यावर पुरस्कार स्विकारणार्या व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते व दुसर्या बाजूला चार सिंह असलेली सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील चौमुखी सिंहाची (चारसिंह) प्रतीमा ही राजमुद्रा व धम्मचक असते.
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १५ पेक्षा अधिक जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४८ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.
दि. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. पहिला पुरस्कार १९५४ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ यांना तर ४८ वा माजी राष्ट्रपती (१३ वे) प्रणव मुखर्जी यांना गेल्या वर्षी २०१९ देण्यात आला.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते यांना १९९० साली (मरणोत्तर अ. नं. २२) देण्यात आला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फार फार उशिरा हा पुरस्कार मिळाला याचे दु:ख वाटते.*
इ. स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.
खरं म्हणजे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच त्यांच्या हयातितच त्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे होते. पण अस घडू देईल ती काँग्रेस कसली.
*भारतातील सरकार हे लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार असावे. ब्रिटिशांपेक्षा लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य यायला हवे. अशी स्वातंत्र्याची मागणी ब्रिटिश पंतप्रधान यांच्याकडे त्यांच्या तोंडावर त्यांच्याच देशात जाऊन करणारे बाबासाहेब पाहून ब्रिटिश सुध्दा हादरले होते.* *बाबासाहेबांनी ही मागणी मुळात आकार घेण्याचे कारणच आहे ब्रिटिशांचे पक्षपाती राजकिय धोरण अन समतेचे सोंग. असे हे निष्क्रिय सरकार काय कामाचे, सव्वाशे वर्षात ज्यांना अस्पृश्यता हा मुलभूत प्रश्न हाती घ्यावा असे वाटले नाही त्यांना राज्य करण्याचा खरच नैतीक अधिकार आहे का ? याचं त्यानी आत्मचिंतन करुन बघावं. एवढे खडे बोल १९३० साली ब्रिटिशांना त्यांच्याच देशात जाऊन सुनविल्याचे उदाहरण आख्ख्या जगात कुठेच नाही.*
त्यानंतर कुठे १९४२ साली गांधीनी बारा वर्षानंतर भारत छोडो हे आंदोलन चालविले होते.