शेतकऱ्यांना .पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या . आ . भा .सेनेचे मुख्यमंत्र्याला निवेदन .
उदगीर प्रतिनिधी .
.लातूर जिल्ह्यात उदगीर . जळकोठ देवणी व इतर तालुक्यात परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे व इतर नागरिकांचे फार मोटे नुकसान झाले आहे .पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी पेरलेली पीक आले नाही म्हणून दुबार - तिबार पेरणी करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा परवाच्या मुसळधार झालेल्या पावसामुळे मुग ' उडीद .सोयाबीन ..तूर . कापूस .ज्वारी .ऊस . व इतर पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडुन कर्ज घेऊन कशीबशी पेरणी केली होती .परंतु निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून नेले आहे . यामुळे शेतकरी नैराश्याचे जीवन जगत आहे .
तसेच शहरात व खेडोपाड्यात अनेक जणांचे घरे / भिंती कोसळल्या आहेत .तर काहीजणांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन खाण्यापिण्याचे राशेन व संसारोपयोगी वस्तू पाण्याने भिजवून गेल्या असल्यामुळे शेतकरी व जनतेची अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी गत झाली आहे . त्यामुळे सर्व शेतकरी / नागरीक संकटात आहेत .
म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व ज्यांचे घरे दारे भिंती पावसाने कोसळल्या व काही जणांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाली आहेत अशा घटना जागी जाऊन शासनाने पंचनामे करावे व त्यांना त्यांच्या नुकसानी प्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देऊन त्याच्या कुटुंबाला आधार द्यावा . अन्यथा अखिल भारतीय सेना च्यावतीने लोकशाही मार्गाने योग्य ते आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी . अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय सेना उदगीर /लातूर यांच्या वतीने दि .25 . 9 .2020 रोजी जिल्हाअधिकारी लातूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा . ना श्री उद्धवजी ठाकरे . यांना देण्यात आले .
या निवेदनावर अखिल भारतीय सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री विश्वनाथ गायकवाड . जिल्हा कार्याध्यक्ष . अॅड .डॉ . श्रवणकुमार माने . जिल्हा सरचिटनीस . उत्तम च०हान .मा. जिल्हाध्यक्ष .विकृम जाधव . जिल्हा संघटक . शरफो६ीन शेख . इत्यादी च्या स्वाक्षऱ्या आहेत .
मा संपादक
दै़/ साप्ताहिक ....
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय व्रतपत्रास देऊण सहकार्य करावे .
आपला
विश्वनाथ गायकवाड
अखिल भारतीय सेना लातुर / उदगीर