,महिला बचतगटाचे कर्ज माफ करावे ः रिपाइं. ची मागणी

*उदगीर/जळकोट तालुक्यातील महिला बचत गटांना वितरित केलेले कर्ज माफ करा*


उदगीर ; उदगीर/ जळकोट तालुक्यातील महिला बचत गटांना देण्यात आलेली सर्व कर्ज माफ करा अशी मागणी रि.पा.इं.(आ) युवक आघाडीचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे 


उदगीर/ जळकोट तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलानी मायक्रोफायनान्स कंपनीकडून सूक्ष्म,लघु उधोग, होमलोन, घेतले आहे गेल्या 3/4 महिन्यापासून कोरोना महामारीमुळे हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे यामुळे सध्या पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला असून यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे तसे मोबाईलवर कॉल येत आहेत व रिझर्व्ह बँकेने हफ्ते भरण्यासाठी पुढील तीन महिने मुदत वाढवून देऊन सुद्धा सदरील मायक्रो फायनान्स कंपन्याकडून हफ्ते भरण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, तसेच वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे कर्मचारी घरी चकरा मारत असल्याने आणि बचत गटातील महिला अगोदरच अर्थिक अडचणीत व कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने होमलोन व बचत गटाच्या कर्जाचे हफ्ते कसे भरायचे असा प्रश्न गटाच्या महिलाआणि व्यक्ती समोर निर्माण झाला आहे तरी आधीच उपासमारीत होरपळत असलेल्या समाजातील घटकांना या मायक्रो फायनान्स कंपनीकडून आणखी त्रास दिला जात आहे तरी उदगीर/जळकोट तालुक्यातील बचत गटांना वितरीत केलेले कर्ज तात्काळ माफ करा अन्यथा दि. 24/06/2020 रोजी उपविभागीय कार्यालय उदगीर समोर भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा रि.पा.इं.(आ) युवक आघाडीचे सुशीलकुमार शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे