वकिलांना आर्थिक मदत द्या. अॅड. आण्णाराव पाटील

अड अण्णाराव पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेकडे वकिलांना आर्थिक मदत करण्याची मागणी
----------------------------------------
लातुर दि.०४.०५.२०२० रोजी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अड अण्णाराव पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे कोरोना कोविड१९च्या महामारीमुळे राज्यातील वकिलाची वकिली बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, सध्या अनेक वकिलांना अडचणीतुन जावे लागत आहे, लॉकडाऊन उठल्यावर ही अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत त्यामुळे वकील बांधवांचे मनोधैर्य खचले जाणार नाही, भविष्यात वकिलांना ताठ मानेने व स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. महाराष्ट्र व वकील परिषदेकडे उपलब्ध असलेल्या वकील कल्याण निधींतून लॉक डाऊन सुरु झाल्यापासून ते उठे पर्यंत प्रति महीना रक्कम रुपये १५,०००/-प्रमाणे तात्काळ मदत महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या माध्यमातून होणे अतिशय गरजेचे आहे. महाराष्ट्र व वकील परिषदेकडून देण्यात येणारी मदत रक्कम वेल्फेर फंड स्टॅम्प चे तिकीट २ रुपये ऐवजी २०रुपयाचे करण्यात यावे व ते वकिलपत्रावर लावणे सक्तीचे करण्यात यावे. या माध्यमातून भविष्यात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेवर ही आर्थिक ताण येणार नाही व आर्थिकनिधी  भरुन निघेल
आर्थिक मदतीचा तात्काळ निर्णय घेऊन, सदरील रक्कम वकिलांच्या खात्यावर  सरळ हस्तांतरण करण्याची मागणी अड अण्णाराव पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व लातुर जिल्हा वकील मंडळास निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे
निवेदनावर अड प्रदीपसिंह गंगणे,अड सचिन बावगे, अड नरेंद्र नवरकेले,अड अभिजित मगर, अड श्रीकांत मोमले, अड सलिम डावकरे, अड राहुल क्षिरसागर, अड अश्विन जाधव, अड बालाजी सिंगापुरे रेड्डी, अड रवि आडसुळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तर लातुर जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष अड सचिन पंचाक्षरी, कोषाध्यक्ष अड गणेश गोजमगुंडे, अड हृदयनाथ डांगे आदी उपस्थित होते