महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रासाठी दुःखद बातमी.
देशाची आर्थिक राजधानी म्हणुन माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहनसिंग ह्यांनी मुंबईत International Financial Sercives Center(#IFSC) जाहीर केलेले पण केंद्रातील भाजप सरकारने ते केंद्र गांधीनगरला हलवुन महाराष्ट्राबाबतचा दुजाभाव दाखवुन दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या #GIFT प्रोजेक्टला चालना मिळावी म्हणुन केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे हे परत एकदा उघड झाले आहे.आपल्या राज्याबाबत प्रेम असण्यात गैर काहीच नाही पण त्यासाठी नवीन काही न आणता दुसऱ्याच्या ताटातुन हिसकावून घेणे गैर आहे.
हे आत्ताच एकदम घडले का तर नाही याची तयारी पद्धतशीर पण चालु केलेली ज्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने चांगलाच हातभार लावला.IFSC मुंबईसाठी आरक्षित असलेला #BKC मधील जमिन बुलेट ट्रेन टर्मिनल साठी देऊन फडणवीस सरकारने महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे.
CM महाराष्ट्राचे पण चाकरी गुजरातची अशी गत होती माजी मुख्यमंत्र्यांची आणि हायकमांडला खुश करण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कार्यक्रम त्यांचा अजुनही चालुच आहे.ज्या महाराष्ट्राने भरघोस मत देऊन भाजपला विजयी केले त्यांच महाराष्ट्रासोबत गद्दारी कसे काय करावी वाटली ह्यांना ?
#IFSC केंद्र मुंबई मधुन गेल्याने महाराष्ट्रतील तरुणांच्या हक्काच्या Financial & Ancillary Sector मधील दोन लाख नोकऱ्या गांधीनगरला गेल्या व केंद्रामुळे उभा राहणारा अप्रत्यक्ष रोजगारचा हिशोब मांडणे अशक्यच आहे.हायकमांडला खुश करण्यासाठी महाराष्ट्राचा विकास गुजरातला विकण्यात आला.
महाराष्ट्रासोबत केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने गद्दारी करुन #महाराष्ट्रद्रोह केला आहे जो #महाराष्ट्रदिन दिवशी उघडा झाला हे ही विशेष.निधी देतांनाही सावत्रपणाची वागणुक आणि आंतराष्ट्रीय संस्था काढुन घेतांनाही सावत्रपणा.
महाराष्ट्र दिनाच्या संवादात मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे म्हणाले की प्रेमाने वागले तर महाराष्ट्र भरभरुन प्रेम करतो पण दगाबाजी केली तर काय करायचे याची शिकवण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे.बाकी महाराष्ट्र फक्त दिशाच दाखवत नाही वेळ आल्यावर दशा केल्याशिवाय राहत नाही.
जय महाराष्ट्र 🙏
(फॉरवर्ड)