सांगते ऐक।

लातूरकरांचा जीव टांगणीला 
हाच तो पास ...
असा कोणताही पास महाराष्ट्रातील प्रशासन देत नाही मात्र हरियाणातील उपविभागीय दंड अधिकाऱ्यांनी कसा दिला ? जर राज्यातील प्रशासन असा पास देत नाही तर महाराष्ट्र्र प्रवेश केल्यानंतर तो ग्राह्य कसा धरण्यात आला? त्यांना राज्यात आल्या बरोबर त्याच ठिकाणी का थांबवून ठेवन्यात आले नाही ? त्यांना प्रत्येक ठिकाणी विना तपासणीचे पुढील प्रवास कसा करू दिला ?
एकीकडे परराज्यातील हजारो मजूर यांना संरक्षण राज्य सरकार करत असताना त्या बारा लोकांना हरियाणा राज्य सांभाळू शकत नव्हते का ? असे कोणते महत्वाचे काम होते की ते प्रवास करत होते ? लाखो लोक अडकून पडले आहेत ... हे त्यात वेगळे का होते? त्याच्यावर लातुरात उपचार करतायत त्याची बाधा येथे झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का ? मानवता हाच निकष लावायचा आहे तर तो लाखो लोकांना लावता येत नव्हता का ? लातुरात परराज्यातील अडकून पडलेल्या लोकांना 
अन्न पाणी आणि निवासाची सोय करत आहे प्रशासन ...तसे इतर भागात करत नाहीत का ? हे लोक ज्या ज्या भागातून आले तेथील सर्व जबाबदार प्रशासन आणि अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार ? हे लोक लातुरात आले ...त्याचा तो दोष नाही मग तो प्रशासनाचा आहे त्यांना प्रवास करू दिला ? त्याची तपासणी नियमात राहून केली असे सांगणाऱ्या प्रशासनाने त्याची तपासणी न करता त्यांना राज्यात प्रवेश दिला त्यावर काय कारवाई होणार ते सांगावे .... जे पोलीस लातुरातील लोकांना बाहेर पडले तर मारत होती ....त्याचे अधिकारी आता कश्या प्रकारे लोका समोर नियम सांगू शकतो ? लातूरकराना लाठ्या त्यांना सुविधा .....कमाल आहे नियमांची ....राज्य शासनाची .....


टीप --हजारो सूचना राज्य शासन रोज देत आहे ...त्याच्यासाठी एक फोटो टाकला आहे तो वाचावा ..असे नियम या प्रवासी लोकांना नव्हते का ? रोज  शासन वृत्त काढणार्यांना ते फक्त कागडवरच ठेवावे असे वाटले असेल नाही का ?


पास फोटो सौजन्य -Pravin Ghotale-Shinde