*लॉकडाऊनमुळे पत्रकार आर्थिक संकटात*
*शासनाने लक्ष्य देण्याची गरज*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पत्रकारिता क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे.वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचारी छपाई विभागातील कर्मचारी आणि टेबल वर्किंग वर काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहे.अनेक वृत्तपत्रे प्रकाशना पासून अलिप्त होऊ लागले आहेत तर अनेक वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले आहेत.ज्या राजकारण्यांना याच पत्रकारितेने आतापर्यंत सहकार्य केले त्या राजकारण्यांनी अशा संकटाच्या वेळी पत्रकारांसाठी धावून येणे खूप गरजेचे झाले आहे.अनेक वृत्तपत्रांच्या बंद अवस्थेत असलेल्या कार्यालयात कर्मचारी हताश होऊन पुढे काय करायचे या चिंतेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांसाठी जीव तोडून काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाकडून अद्याप तरी कुठलीही मदत जाहीर झालेली नाही उपाशीपोटी राहून पत्रकारितेचे व्रत कसे पूर्ण करणार हाही प्रश्न आहे. पत्रकारांच्या आर्थिक विवंचने मुळे त्याचे अख्खे कुटुंब देखील अडचणीत सापडले आहे अशावेळी राजकारण्यांनी व शासनाने योग्य ती मदत देऊन पत्रकारिता क्षेत्रातही योगदान द्यावे.शासनाने प्रत्येक पत्रकारास काही आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तू देऊन या संकटातून बाहेर येण्यासाठी धीर द्यावा एवढी माफक अपेक्षा केली जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये राज्य सरकार कडून पत्रकारांसाठी अशी घोषणा केली तर अशा संकटसमयी पत्रकारांना दिलासा मिळेल व वृत्तपत्रांमध्ये काम करत असणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येणार नाही तेव्हा राजकारण्यांनी आणि सरकारनेही याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी आशा वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांकडून केली जात आहे शहरी भागातच पत्रकारिता आहे असे नाही तर ग्रामीण भागातही पत्रकारांची संख्या अधिक आहे त्याच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी मदतीची खूप गरज निर्माण झाली आहे..त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पत्रकारांना योग्य ती मदत करावी.
लक्ष्मीकांत कस्तुरे
मुख्य संपादक बसवा टिव्ही मराठी
कार्यकारी संपादक सा.देशरक्षा