*रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान*
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला आज 1 एप्रिल 2019 रोजी 84 वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच, परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे.
रिजर्व बँक ही एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते. रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली स्थापन ब्रिटीश ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला; रिजर्व बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे.
सन १९१५ साली प्राचीन भारतीय अर्थनीती(Ancient Indian Commerce) या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळाली, त्यानंतर १९१६
साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश " (National Divident of India) हा
प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्स या कंपनीने "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास" (The Evolution of Provincial Finance in British India ) म्हणून प्रसिद्ध केला, बाबासाहेबांनी या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. विद्यापीठाने अधिकृत पणे Doctor of Philosophy हा किताब बहाल केला.
सन १९२३च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या " (The problem the Rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि तो मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स (DSc) ही पदवी बहाल करण्यात आली डॉ. बाबासाहेबांचे सखोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर कटाईम्स लंडन आणि इकोनोमिक...