५० वर्षापासून कष्टकरी वंचितच... नागरिकांना तात्काळ घरकुल योजना द्या

५० वर्षापासून कष्टकरी वंचितच... नागरिकांना तात्काळ घरकुल योजना द्या..


उदगीर(प्रतिनिधी): शहरातील सव्हे नं.३७८ व ९७ मधील आरक्षण रद्द करून म.फुलेनगर, बागबंदी एरिया, संजयनगर, चंद्रमादेवी नगर, गांधीनगर, गोविंदनगर, धनगर सोसायटी, संग्राम कॉलनी, वडार गल्ली या भागातील नागरीक गेल्या ५० घरकुल योजना द्या वर्षापासून घरकुलाच्या प्रतिक्षेत असुन आजपर्यंत त्याना कुठलाही शासकीय लाभ मिळाला नाही. या ठिकाणचा रहिवासी गरीब व कष्टकरी असल्याने



त्यांना तात्काळ कबाले देण्यात यावे या मागणीसाठी नगरसेवक रामेश्वर पवार याच्या मार्गदर्शनाखाली काल दि.२३ जानेव१- री रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य माचा काढून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना तात्काळ । चालु करण्यात यावे. म.फुलेनगर, बागबंदी एरिया, संजयनगर, चंद्रमादेवी नगर, गांधीनगर, गोविंदनगर, धनगर सोसायटी, संग्राम कॉलनी, बडार गल्लीतील तात्काळ कबाले द्यावे. नगर परिषद मालमत्ता रजि.ला भोगवटदार रकान्यात नोंद आहे ती मालकी रकान्यात करावे. शासनाच्या निर्णयाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावे आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. यावेळी म.फुलेनगर ते उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो महिला व परूषाच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मागण्यासंबंधीचे फलक दाखवुन व घोषणाबाजी करण्यात