पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
यामुळे सर्वसामान्य व्यक्तींकडून समाधान व्यक्त केलं जातं आहे. तीन दिवसांपूर्वीच संबंधित आरोपींनी एका तरुणाला बेदम मारहाण करत धमकावले होते. वाकड पोलिसांनी विशाल कसबे, अरविंद साठे, बग्या उर्फ राहुल लष्करे, सूरज पवार यांची धिंड काढली. विशाल कसबे हा तडीपार गुंड आहे.