महिलेचा सन्मान करणे, 'ती'चे संरक्षण करणे हीच शिवाजी महाराजांची शिकवण आहे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मध्ये महिलेला सर्वोच्च प्राधान्य दिले. शत्रूच्या महिलेचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मान केला. शत्रूशी लढाई करताना सुद्धा त्यांनी कधीही महिलेचा अवमान केल्याची इतिहासामध्ये नोंद नाही. याउलट शत्रूंनी महिलांचा अनादर केला, छळ केला... याची नोंद आहे. शिवरायांनी मात्र या विरोधात कठोर शासन करून महिलांवर अन्याय - अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन केले. जिजाऊंची तशी शिकवणच शिवरायांना होती. आज महाराष्ट्रासह देश सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांना जाळून मारले जात आहे, ही महाराष्ट्राच्या विचारांना काळिमा फासणारी गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणांनी व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा अभ्यास करून शिवचरित्राचा जागर करून समाजाचं प्रबोधन करत प्रत्येकाने शिवचरित्र अंगीकारले पाहिजे. महिलांचे संरक्षण करून यांना प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च सन्मान दिला पाहिजे. हीच खरी शिवरायांची शिकवण आहे... असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले